Vidhan Bhavan : फक्त मुंबईतच नाही तर या शहरात देखील आहेत महाराष्ट्राचे विधानभवन

आज पासून नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू
Vidhan Bhavan
Vidhan Bhavanesakal
Updated on

Vidhan Bhavan : आज पासून नागपूर येथे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी नागपूर पॅक्टनुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं असं ठरलं होतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही.

Vidhan Bhavan
Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

नागपूर पॅक्टचा सन्मान म्हणून यावर्षीचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणीही भाजपने केली होती, पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिली नव्हती, म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईमध्येच झालं. मात्र तीन वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी जाणून घेऊ महाराष्ट्रात मुंबई सोडून इतर कुठे आहेट विधानभवने?

Vidhan Bhavan
Christmas 2022 : नक्की सॅंटा क्लोज म्हणजे कोण? का देत होते ते लहान मुलांना गिफ्ट

पुणे येथील विधान भवन

१९३५ च्या कायद्यान्वये निर्माण झालेल्या विधानपरिषदेचे पहिले अधिवेशन २० जुलै १९३७ रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये भरले होते व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे विधानपरिषदेचे पहिले अधिवेशन १७ ऑक्टोबर १९४७ रोजी पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये भरले होते. पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये विधानपरिषदेची एकूण १४ अधिवेशने झाली. त्यानंतर नागपूर करारातील तरतुदीनुसार नागपूर येथील विधान भवनात हिवाळी अधिवेशन दरवर्षी घेतले जाते. १९६२-६३ चा अपवाद वगळता ते अव्याहतपणे सुरु आहे.

Vidhan Bhavan
Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

मुंबई येथील जुने विधान भवन

मुंबई येथील जुन्या विधान भवनाची इमारत १८७६ साली दर्यावर्दी लोकांच्या उपयोगासाठी "खलाशीगृह"" म्हणून बांधण्यात आली होती. जून १९२८ मध्ये शासनाने हे खलाशीगृह ताब्यात घेतले व त्याचे विधान भवनात रुपांतर केले. १८ फेब्रुवारी १९२९ रोजी तत्कालीन राज्यपाल मेजर जनरल सर फेड्रिक साईक यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले. २४ एप्रिल १९८१ पर्यंत या आताच्या जुन्या विधान भवनात विधानपरिषदेची अधिवेशने संपन्न झाली. २५ एप्रिल १९८१ पासून नवीन विधान भवनामध्ये अधिवेशने भरविण्यात येऊ लागली.

Vidhan Bhavan
Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

मुंबई येथील नवीन विधान भवन

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते दिनांक १९ एप्रिल १९८१ रोजी या नवीन विधान भवनाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. ही वास्तू म्हणजे वास्तुशिल्पाचे एक मनोज्ञ रूप आहे. २ मार्च १९८१ रोजी आताच्या जुन्या विधान भवनामध्ये सुरु झालेले विधानपरिषदेचे अधिवेशन २५ एप्रिल १९८१ पासून नवीन विधान भवन इमारतीमध्ये सुरु झाले. 

Vidhan Bhavan
Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा एगलेस ड्रायफ्रूट केक

नागपूर येथील विधान भवन

१९६० पासून महाराष्ट्र विधिमंडळाची अधिवेशन नागपूर येथे भरु लागली. तत्पूर्वी विदर्भ भाग १९५६ पर्यंत मध्यप्रदेश राज्यात समाविष्ट होता व नागपूर हे मध्यप्रदेश राज्याचे राजधानीचे ठिकाण होते. नागपूर येथील कौन्सिल हॉल इमारतीमध्ये तत्कालीन मध्यप्रदेश विधानसभेची अधिवेशने भरत असत. ही इमारत १९९४ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे पहिले नागपुर अधिवेशन दिनांक १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० या काळात संपन्न झाले होते.

Vidhan Bhavan
Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटवा भाजी कशी तयार करायची?

केवळ १२० सदस्य बसण्याची क्षमता असलेले पूर्वीचे नागपूर येथील विधानसभा सभागृह व तात्पुरती बसण्याची सोय असलेले विधानपरिषद सभागृह यामुळे सदस्यांना अडचणी, असुविधा व गैरसोईना तोड द्यावे लागले तरीही १९६० सालापासून केवळ १९६२-६३ सालचा अपवाद वगळता सातत्याने नागपूर येथे प्रतिवर्षी हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे.

Vidhan Bhavan
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

१९९३ मध्ये नागपूर येथील विधान भवनाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ११ डिसेंबर १९९३ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते या नवीन विस्तारीत सभागृहाचे उद्घाटन झाले व तेथे विधानसभेच्या बैठका भरु लागल्या आणि पूर्वीच्या विधानसभा सभागृहात विधानपरिषदेच्या बैठका घेण्यात येऊ लागल्या.

Vidhan Bhavan
Gajar Ka Halwa: हिवाळ्यात गाजरचा हलवा खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

नागपूरमध्ये सदस्यांच्या निवासाकरिता बांधलेल्या प्रशस्त आमदार निवासामुळे सदस्यांची व अन्य अभ्यागतांचीही सोय होऊ शकते. हे पाहिल्यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखमार्फत राज्यातील विद्यापीठांच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन वा विषयांच्या पदव्युत्तर विद्याथ्यांकरिता आयोजित केलेला अभ्यासवर्ग दरवषी या ठिकाणी घेतला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com