

Major Row Over Visitor Passes in Vidhan Bhavan! Powers of Deputy Chairman Sachin Ahir and Deputy Speaker Anna Bansode Curtailed
Sakal
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात येणाऱ्या नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेश पासेस वरून (Visitor Entry Passes) मोठा प्रशासकीय वाद पेटला आहे. विधिमंडळ प्रशासनाने लागू केलेल्या नव्या सुरक्षा नियमांमुळे विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभ्यागतांना प्रवेश पास देण्याच्या अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांच्या दालनात येणाऱ्या नागरिकांवरच बंधने आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड नाराजी पसरली आहे.