जाणून घ्या राज्यातील प्रमुख पराभूत नेते | Vidhan Sabha Result 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय. 

पुणे : विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. त्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसला असून, त्यांना थेट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय. 

कोण आहेत प्रमुख पराभूत?
एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे - मुक्ताईनगर

 (जळगाव) 
गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत पराभूत - सांगोला 
(सोलापूर)
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील - इंदापूर (पुणे)
मंत्री पंकजा मुंडे - परळी (बीड)
उदयनराजे भोसले - सातारा (लोकसभा)
राजेश क्षीरसागर - कोल्हापूर उत्तर 
विजय शिवतारे - पुरंदर (पुणे)
मंत्री राम शिंदे - कर्जत जामखेड (नगर)
प्रदीप शर्मा - नालासोपारा (पालघर)
अभिनेत्री दिपाली सय्यद - कळवा-मुंब्रा (ठाणे)
वैभव पिचड - अकोले (कोल्हापूर)
समरजितसिंह घाटगे - कागल (कोल्हापूर)
सुरेश हाळवणकर - इचलकरंजी (कोल्हापूर) 
बाळा भेगडे - मावळ (पुणे) 
अर्जुन खोतकर - जालना 
रमेश म्हात्रे - कल्याण ग्रामीण (ठाणे)
शशिकांत शिंदे - कोरेगाव (सातारा) 
डॉ. सुजित मिणचेकर - हातकणंगले (कोल्हापूर) 
हर्षवर्धन जाधव - कन्नड (औरंगाबाद)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 maharashtra result prominent leaders lost election