महाराष्ट्रातील 'या 'दिग्गजांनी केलं मतदान.. चला बाहेर पडा, मतदान करा !

महाराष्ट्रातील 'या 'दिग्गजांनी केलं मतदान.. चला बाहेर पडा, मतदान करा !

महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात. 

मुंबई :

  • मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय मिळेल असा विश्वास गोयलांनी यावेळी व्यक्त केला. 
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावlला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, सून मिताली तसंच मुलगी उर्वशी देखील आहेत. मतदानाआधी ठाकरे कुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शनदेखील घेतलं.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. शरद पवारांनी नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळेंसह ताडदेव मतदान केंद्रावर मतदान केलं. मोठ्या संख्येने मुंबईकर घरातून बाहेर पडून स्थिर सरकार निव़डतील, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. 
  • मुंबईत मनोहर जोशी यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहेत. त्यांनी शिवसेना आणि भाजपला टोला लगावत 200 जागा येणं कठीण असल्याचं म्हटलंय.  
  • मुंबईत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुणे / पिंपरी चिंचवड :

  • महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनीही सकाळीच बजावला मतदानाचा अधिकार.
  • औंध : आयटीआय  मतदान केंद्रावर अभिनेता सुयश टिळक याने मतदानाचा हक्क बजावला
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे व माजी महापौर मोहिनी लांडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला 
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथे मतदान केले. 
  • भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे व माजी महापौर मोहिनी लांडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला 
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती :

  • आज राज्यात लोकशाहीचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांसह नेतेमंडळींनीही मतदानाचा हक्क बजावलाय. अजित पवार बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सकाळ सकाळीच अजित पवार मतदानाचा हक्क बजावलाय.
  • खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय. संपूर्ण पवार कुटुंबीयांसह सुप्रीया सुळेंनी मतदान केलं. 

नागपूर :

  • नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 वाजताच भागवत मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केलं.
  • दरम्यान, नागपूरमध्येच केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गडकरींच्या पत्नी कांचन गडकरीही त्यांच्यासोबत होत्या. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावलं आहे.

सातारा :

  • साताऱ्यात उदयन राजे भोसलेंनीही मतदान केलं. विशेष म्हणजे साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी मतदान होतंय.
  • या दोन्ही जागांसाठी  उदयन राजेंनी मतदान केलं आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. 

परळी :

  • परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बहिण पंकजा मुंडेंविरोधात उभे ठाकलेल्या धनंजय यांनी, मतदानाला जाण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेतले आणि आईनेही त्यांना विजयी होण्याचे आशीर्वाद दिले.
  • धनंजय मुंडे थोड्याच वेळात सहकुटुंब मतदानाचा हक्क् बजावणार आहेत.

महाराष्ट्र :

  • केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवेंनी जालन्यात मतदान केलं.
  • दरम्यान सोलापूरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही सहकुटुंब मतदान केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचं आवाहन करत मतदान केलंय.
  • विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मतदान केलंय.
  • कर्जत जामखेड मतदार केंद्रात जाऊन राम शिंदे यांनी मतदान केलंय.
  • राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी पत्नी साधना यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
  • राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. गोंदियात त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. तसंच लोकशाही बळकट करण्यासाठी इतर नागरिकांनीही घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय.

WebTitle : vidhansabha 2019 political leaders who did their voting 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com