Vidhan Sabha 2019:मनसेचे दोन उमेदवार जाहीर; राज ठाकरेंकडून पहिल्या सभेचीही घोषणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज, विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज, मुंबईत दोन नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचा आगामी कार्यक्रम सांगण्यात नकार दिला. पण, पहिल्या जाहीर सभेची तारीख सांगितली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज, विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज, मुंबईत दोन नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचा आगामी कार्यक्रम सांगण्यात नकार दिला. पण, पहिल्या जाहीर सभेची तारीख सांगितली.

पहिली जाहीर सभा कधी?
मनसेमध्ये नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज यांनी किती उमेदवार निवडणूक लढवणार? याविषयी कोणतिही माहिती दिली नाही. तसेच कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार हेदेखील सांगितले नाही. राज म्हणाले, 'हळू हळू तुम्हाला मी सगळी माहिती देत जाईन. थोडा धीर धरा. योग्य वेळी तुम्हाला सगळं सांगणार आहे.' त्याचवेळी राज ठाकरे यांनी येत्या ५ तारखेला पहिली जाहीर सभा घेणार असल्याचेही सांगितले. राज ठाकरे म्हणाले, 'मी सगळं बोलणार आहे. इतके दिवस मी का बोललो नाही, हेदेखील स्पष्ट करणार आहे.'

कोण आहेत नरेंद्र पाटील?
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची जमीन सरकारने एका प्रकल्पासाठी घेतली होती. त्याच्या मोबदला न मिळाल्याने ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांनी मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. आज, धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तसेच नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही यावेळी मनसेमध्ये प्रवेश केला. दरम्यान, हे दोघेही विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019: Raj Thackeray announces date of first meeting