esakal | विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...
sakal

बोलून बातमी शोधा

विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

विधानभवनाबाहेर राडा; भाजप नेत्यांकडून माईक, स्पिकर काढून घेतला...

sakal_logo
By
विराज भागवत

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पायऱ्यांवरच भाजपने भरवलं अधिवेशन

मुंबई: सध्या जे सारं चालू आहे ते महाराष्ट्रातील आणीबाणी आहे. आमचा आवाज दाबला जात आहेत. तसेच माध्यमांचीदेखील मुस्कटदाबी केली जात आहे. पण तरीही आम्ही आमचा आवाज दाबू देणार नाही. काहीही झालं तरी आम्ही सरकारविरोधात बोलतच राहणार आणि या सरकारचा भ्रष्टाचार उघडा पाडणार, अशी ठाम भूमिका राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे जे निलंबन झाले ते चुकीचे आहे असे ते म्हणाले. त्याचाच निषेध म्हणून विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या नेत्यांनी प्रति विधानसभा भरवली आणि विविध ठराव करण्यास सुरूवात केली. पण काही वेळाने विधानसभेच्या परिसरात असणाऱ्या मार्शलना पाठवून भाजप नेत्यांकडील माईक आणि स्पीकर काढून घेण्यात आले. त्यानंतर भाजपचे नेतेमंडळी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. (Vidhan Sabha Adhiveshan Total Chaos BJP vs Bhaskar Jadhav Fighting Heated Arguments Protest Agitation)

हेही वाचा: भाजपचे आमदार कोर्टात गेले तरी काही उपयोग नाही- छगन भुजबळ

"विधानसभेला पहिल्यांदाच असे येथे उचलून आणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असे झाले आहे. पत्रकारांवर दडपशाही करण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. भ्रष्ट्राचार आम्ही मांडू नये यासाठी काल 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. मी आणि आमचे लोक बोलणार हे माहिती होतं म्हणूनच माईक जप्त करण्यात आला. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा: मुस्लिमांची नाव का टाकली? माझं नाव टाकायचं? - नाना पटोले

"महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान या महाराष्ट्राने पाहिले. लपविलेल्या मृत्यूची संख्या मी सांगत नाही. सरकारने काय व्यवस्था केल्या? मुंबई, पुण्याची वाट सरकारने लावली. 3 कोटी लसीचा आज ठराव कसा आणता? मोदी सरकारने लस दिली म्हणून एक नंबर वर महाराष्ट्र आहे. कोरोनात किडेमुंग्याप्रमाणे लोक मेले ही वाईट बाब आहे. मुंबईत कोरोना मृत्यू लपविण्यात आले. सरकारने कोरोनाचे 6636 मृत्यू लपवले. मुंबई मॉडेल नाही तर मुंबई हे मृत्यूचे मॉडेल आहे. एकूण 2299 मृत्यू हे कोविड आणि इतर कारण दाखविले आहेत. 72 टक्के मृत्यू अन्य कारणामुळे दाखविले आहेत. दुसऱ्या लाटेत आकडा कमी करण्यासाठी टेस्टिंग कमी करण्यात आले. सरासरी रुग्ण संख्या कमी दाखविण्यात आली", असा आरोप फडणवीस यांनी केला.

loading image