शरद पवारांची पत्रकार परिषद; 'या' घोषणांची शक्यता | Election Results

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. 

पुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपला बिनाशर्त पाठिंबा दिला होता. पण 2019 च्या कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला समर्थन देणार नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्या असून भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करणे जवळपास अशक्य आहे. नुकतीच ईडीची झालेली कारवाई लक्षात घेता आणि त्यांना भाजपकडून झालेला त्रास लक्षात घेता आघाडीकडून शरद पवार भाजपला पाठिंबा न देता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी चर्चा सध्या आहे.

तसेच, शरद पवार हे महाआघाडीला दिलेल्या कौलाबद्दल जनतेचे आभार मानतील असे सांगण्यात येत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढलेल्या आहेत. तसेच भाजपचे घटलेले मताधिक्यावरही ते बोलतील असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही मोठी आघाडी घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ते सर्वात पुढे होते. साताऱ्यातील सभेत त्यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्या सभेचाही निकालावर परिणाम झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha election Results Sharad Pawar announced Press Conference at 1:30 PM