
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्तापक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी वाईट वागणूक मिळाल्याचं म्हटलं आहे. शिवाय आपल्याला अडीच वर्षे मंत्रिपद दिलं तरी नको, असं ते म्हणाले आहेत.