Vijay Shivtare : भूमिका बदलली अन् कार्यकर्ता संतापला; शिवतारेंच्या विरोधात सणसणीत पत्र Viral

13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार ''केला. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.''
Vijay Shivtare
Vijay Shivtareesakal

Vijay Shivtare News : मागच्या दोन-तीन आठवड्यांपासून अजित पवारांवर सूड उगवण्याची भाषा करणारे विजय शिवतारे यांनी परवा अचानक माघार घेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी असा यू टर्न घेतल्यामुळे संतापलेल्या एका कार्यकर्त्याने निनावी पत्र लिहिलंय. हे पत्र व्हायरल होत असून त्याच्यातील खरमरीत मजकुराची चर्चा होतेय.

कार्यकर्त्याच्या निनावी पत्रामधील मुद्दे...

  • बापू तुम्ही अपक्ष लढण्याचं जाहीर केलं होतं.. तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने एल्गार पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी 'राणा भीमदेवी' थाटाने बोलत राहिलात. काहीही झालं तरी आता माघार नाही, बारामती कोणाची जहागिरी नाही' यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची वज्ञमूठ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देवू, पण, आता निर्णय घेतलाय, ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली.

  • 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.

Vijay Shivtare
केजरीवाल, सोरेन यांची तात्काळ सुटका ते भाजपची SIT चौकशी; प्रियंका गांधींनी मांडल्या 'इंडिया'च्या पाच प्रमुख मागण्या
  • आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का ? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं क्वॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीचं अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरे होईल.

  • काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मिडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मिडीयाने तुमची लया फार घालवून टाकलं. सोशल मिडीयात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे. पुरंदरचा मांडवली सम्राट', पाकीट भेटलं का?, घुमजाव, शिवतारे जमीं पर, चिऊतारे', 'शेवटी, आपला आवाका दाखविला', '50 खोके शिवतारे ओके, अशा खोचक कंमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे.

Vijay Shivtare
IPL 2024, DC vs CSK: ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई का साधू शकते विजयाची हॅट्ट्रिक? ही आहेत कारणे
  • मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे, हे खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्किए वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय?

  • आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय म्हणून आता तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन 'गोंधळ' घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. अडचण होत आहे. असो जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तुर्तास तरी थांबतो.

कळावे,

आपला कट्टर कार्यकर्ता

असा मजकूर असेलेलं पत्र पुणे, बारामती, पुरंदर परिसरात व्हायरल झालं आहे. छातीठोकपणे अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेल्या विजय शिवतारेंनी माघार घेतल्याने ते चेष्टेचा विषय ठरत आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना भोगावं लागत आहे, असा आशय या पत्राचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com