

मुंबई : पंधरावी विधानसभा गठीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आल्या. विधिमंडळ समित्यांमध्ये महत्वाची मानली जाणारी लोकलेखा समिती काँग्रेसला मिळाली असून समितीचे प्रमुख म्हणून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीचे प्रमुखपद अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.