Maharashtra Politics : शिंदे गट भाजपमध्ये १०० टक्के विलीन होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

त्यांना विधानसभेच्या २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत किती जागा मिळतील हे कळले. ये सब देखते रह जाएंगे असेही वडेट्टीवार म्हणाले.
Maharashtra Politics : शिंदे गट भाजपमध्ये १०० टक्के विलीन होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल लागल्यानंतर जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर भाजपने प्लॅन बी तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हाभाजपमध्ये विलीन होणार, हे १०० टक्के खरं असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. हे १०० टक्के खरं आहे असंच होणार आहे. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

त्यांना विधानसभेच्या २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत किती जागा मिळतील हे कळले. ये सब देखते रह जाएंगे असेही वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Politics : शिंदे गट भाजपमध्ये १०० टक्के विलीन होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Nagpur Accident : दुर्दैवी ! सायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जागा वाटपाबद्दल बोलताना वडेट्टीवारांनी सांगितलं की, आज दिल्लीत जागा वाटपसदर्भात पहिली बैठक होत आहे. कोणी कोणत्या जागा लढवाव्यात यावर चर्चा होईल. तसेच कॉंग्रेस २२ जागा लढवणार असल्याच्या चर्चांवर बोलताना काँग्रेसने किती जागा लढाव्यात यावर मी बोलणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे, असेही विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Maharashtra Politics : शिंदे गट भाजपमध्ये १०० टक्के विलीन होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Himanta Sarma : हिमंता सरमांनी मागितली जाहीर माफी; ब्राम्हण-क्षुद्रांसंबंधीची 'ती' वादग्रस्त पोस्टही केली डिलीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com