Vijay Wadettiwar l कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते- वडेट्टीवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Wadettiwar ,Bhagat Singh Koshyari

राज्यपालांच्यावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणतात, काय ते हातवारे, काय ते हसणं,सारचं किळसवाणं.

कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते- वडेट्टीवार

मुंबई: सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. कधी कोणत्या निर्णयावरून तर कधी घोटाळा प्रकरणावरून एकमेकांवर टीकेची राळ उठवतच आहेत. दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा एका कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर ट्विट करत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: विधानसभा निवडणुका संपत आल्याची चाहूल- वडेट्टीवारांचे सूचक वक्तव्य

विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राज्यपाल हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलत आहेत. यामध्ये ते त्यांच्या लग्नाविषयी बोलत आहेत. सावित्रीबाई यांचे लग्न वयाच्या १० व्या वर्षी केले गेले. तेव्हा जोतिबा १३ वर्षाचे होते. ही दोन मुले लग्नानंतर काय विचार करत असतील. ते सांगताना ते हासत बोलतात आणि चुकीच्या पध्दतीने हातवारे करून बोलताना दिसत आहे. यावरून वडेट्टीवार यांनी राज्यपालांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यपालांच्यावर निशाणा साधताना विजय वडेट्टीवार म्हणतात, काय ते हातवारे, काय ते हसणं,सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव! असा घणाघात त्यांनी केला आहे.

Web Title: Vijay Wadettiwar Criticism On Bhagat Singh Koshyari Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top