Vijay Wadettiwar hits back at Manoj Jarange over Maratha quota remarks
sakal
Manoj Jarange Patil: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन आदेश काढला होता. हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई १० ऑक्टोबर रोजी ओबीसींचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे आक्रमकपणे जीआरविरोधात बोलत आहेत. त्यांना मनोज जरांगे आपल्या शैलीत उत्तरं देत आहेत. मराठा समाजाने काँग्रेसला उभं केलं, मात्र आता वडेट्टीवार पक्षाचं नुकसान करीत आहेत, अशा आशयाचं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. त्याला वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.