
OBC Morcha Mumbai: मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट लागू केलं. या गॅझेटमधील नोंदींनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असं जीआरमध्ये म्हटलं आहे. मात्र याच जीआरविरोधात विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाची हाक दिली आहे. मुंबईत ओबीसींचं आंदोलन होणार आहे.