
हिंगोलीत पिण्याच्या पाण्याची काळजी न घेणं गावकऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. पिसाळलेला कुत्रा विहिरीत पडला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने सर्व गावाने हे विहिरीचे पाणी प्यायले. त्यामुळे गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. या घटनेची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.