अपघात कसा घडला कळलं पाहिजे, पत्नी ज्योती मेटेंची चौकशीची मागणी

vinayak mete accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete
vinayak mete accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete
Updated on

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे काल अपघातात निधन झाले असून आज त्यांच्या पार्थिवावर बिडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

त्यांचं शरीर सांगत होतं की अपघात झाल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात आणले गेले नाही मी डॉक्टर असल्याने मला लगेच कळलं की हा अपघात काही क्षणांपूर्वी किंवा अर्ध्यातासापूर्वी झाला नाही किमान दीड ते दोन तास अपघात घडून झाले आहेत हे मला पाहिल्याबरोबर कळलं. काय झालं ते मला माहिती नाही, माझं ड्रायव्हरशी बोलणं झालं नाही अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे.

चौकशीची मागणी मी करणार आहे. कारण त्याच्यामध्ये काही फॉलप्ले नसला तरी मला हे कळण गरजेचं आहे की नेमका अपघात कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर आम्हाला त्यांनी माहिती दिली आहे, असे ज्योती मेटे म्हणाल्या आहेत. अँब्युलंसचा नंबर सगळ्याकडे असतो, ड्रायव्हर फोन करु शकला असता, तो आम्हाला लोकेशन देखील देत नव्हता, त्या लोकेशनवर आम्हा अँब्युलंस पाठवू शकू त्यामुळे वैद्यकीय मदत कुठे पाठवावी तेच कळत नव्हतं त्यामुळे मी मागणी करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

vinayak mete accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete
RSS मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा, मोहन भागवतांनी फडकवला तिरंगा

पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. दरम्यान या अपघाताच्या चौकशीची मागणी मेटे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

vinayak mete accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete
Independence Day | मोहन भागवत यांनी सांगितलं तिरंगा झेंड्याचा अर्थ, म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com