Independence Day | मोहन भागवत यांनी सांगितलं तिरंगा झेंड्याचा अर्थ, म्हणाले...

independence day 2022 rss chief mohan bhagwat on tricolour after tricolour hoisting at rss headquarters in nagpur
independence day 2022 rss chief mohan bhagwat on tricolour after tricolour hoisting at rss headquarters in nagpur esakal
Updated on

नागपूर : आज देशाचा ७५ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील मुख्यालयात तिरंगा फडकावून मानवंदना दिली. यानंतर राष्ट्रगीत गायले गेले. यावेळी संघाचे अनेक स्वयंसेवक आणि पोलीसही उपस्थित होते.

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे, यावेळी ध्वजारोहनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रध्वज तिरंग्याचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, आपला राष्ट्रध्वज आपल्याला कसा देश निर्माण करायचा आहे ते दाखवून देतो. देश जगभरात मोठा होईल तेव्हा तो कसा असेल, तो देश इतर देशांवर राज्य करणार नाही तो देश आपल्या त्यागातून जगाची उभारणी करेल. जगाच्या हितासाठी त्याग करेल. म्हणूनच राष्ट्रध्वजात सर्वात वरचा रंग हा भगवा आहे, जो त्याग, कर्म, प्रकाश आणि ज्ञानाचा रंग आहे. हे आपण तेव्हाच साध्य करु शकतो जेव्हा आपण अंर्तबाह्य पवित्र असू त्यासाठी दुसरा रंग पांढरा आहे, हे आपण तेव्हाच करु शकू जेव्हा जेव्हा आपला देश भक्कमपणे उभा असेल त्यासाठी समृध्दीचा रंग हिरवा आहे. हे सर्व साध्य करताना आपण ते समाज, मानवता आणि पर्यावरण यांच्या धरणेचं धर्मपालन करत साध्य करू त्यामुळे आपल्या ध्वजाच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे, असे त्यांनी सांगितले.

independence day 2022 rss chief mohan bhagwat on tricolour after tricolour hoisting at rss headquarters in nagpur
RSS मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा, मोहन भागवतांनी फडकवला तिरंगा

केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' आणि 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' साजरा करण्याची योजना आखलेली असून त्याद्वारे देशातील अनेक राज्यांमध्ये नागरिक स्वातंत्र्याचा जल्लोष करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून RSS ला तिरंगा न फडकावण्याच्या आरोपाला सामोरं जावं लागत होतं, परंतु आता देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं RSS च्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांनी झेडा फडकवला. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पक्षांकडून आरएसएस ही संघटना त्यांच्या नागपूरातील मुख्यालयावर स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवत नसल्याची टीका केली जात होती.

independence day 2022 rss chief mohan bhagwat on tricolour after tricolour hoisting at rss headquarters in nagpur
CM शिंदेंकडून ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण, कायम ठेवली परंपरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com