esakal | विनायक मेटे म्हणतात, 'मराठा आरक्षणप्रश्नी मोर्चा काढणारच'
sakal

बोलून बातमी शोधा

vinayak mete

विनायक मेटे म्हणतात, 'मराठा आरक्षणप्रश्नी मोर्चा काढणारच'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून मराठा आरक्षणप्रश्नी येथे पाच जूनला मोर्चा काढणारच असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाला ‘मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे नाव दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मनात पाप असल्याने राज्य सरकार मराठा समाजासाठी काहीही निर्णय घेत नाही. सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. आरक्षण देणे हाती नाही तर निदान इतर सुविधा, सवलती तरी द्याव्यात. समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतातच काम करत आयुष्य काढायचे का, असा सवाल मेटे यांनी केला. पाच जूनला सकाळी साडेदहाला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्‍हा क्रीडा संकुलापासून मोर्चाला सुरवात होईल. विविध मार्गांनी तो जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जाईल.

हेही वाचा: शिरूर कासारच्या ज्वेलर्सचा मृतदेह शेवगावात आणून पुरला

मास्‍क, सॅनिटायझरचा वापर, विशिष्ट अंतर आदींचे पालन होईल. मोर्चा दरम्‍यान वैद्यकीय सुविधाही उपलब्ध असतील. मोर्चासंदर्भात जिल्हाभरात बैठकी घेतल्या असून विविध समित्या स्‍थापन करून वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली आहे. सनदी लेखापाल बी. बी. जाधव यांच्‍यावर निधी संकलनाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सनदी लेखापाल जाधव, अॅड. मंगेश पोकळे, सुधीर काकडे, अॅड. महेश धांडे, विनोद इंगोले, सुहास पाटील, मनोज जाधव, प्रा. गोपाळ धांडे आदी उपस्‍थित होते.

मूक नव्हे; बोलका मोर्चा
यापूर्वी निघालेले मूक मोर्चे होते. हा मोर्चा बोलका, संघर्षशील, न्‍याय मागणारा असले. मोर्चाचे नेतृत्‍व सर्वजण करतील. सर्वांना सोबत घेऊन मोर्चा निघेल. सर्व पक्षांचे मराठा नेते सहभागी होऊ शकतात. त्‍यांचा आदर - सन्‍मान केला जाईल, असेही मेटे म्हणाले.

loading image