Vinayak Mete Death: विश्वासच बसत नाहीये; मेटेंच्या निधनानंतर CM शिंदे भावूक

Vinayak Mete
Vinayak MeteSakal
Updated on: 

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. त्यानंतर राजकारणासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

Vinayak Mete
Vinayak Mete Death: विनायक मेटे यांचे अपघाती निधन

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांना भरून आल्याचं पाहायला मिळालं. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "ही दुर्दैवी घटना आहे. विश्वासच बसत नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय. मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं त्यांनी केली आहे. शिवरायांच्या स्मारकाबद्दलचीही त्यांची तळमळ मला जाणवली".

Vinayak Mete
PHOTOS: मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला! कोण होते विनायक मेटे?

शिंदे पुढे म्हणाले की, "देवेंद्रजी आणि तुम्ही आता सत्तेत आलाय तर समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांना होता, ते भेटल्यावर बोलून दाखवत होते. आज मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठकही आम्ही बोलावली होती. पण त्या आधीच त्यांचं निधन झालं. वहिनींनाही आम्ही भेटलो, त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. मराठा समाजाच्या बैठकीला येताना त्यांचं निधन झालंय. मराठा समाजासाठीची त्यांची तळमळ याची दखल शासन घेईल. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी दुःखद आहे. मराठा समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केलाय, असा नेता आपल्यात नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.