महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महाविकासआघाडीच्या नवीन सरकारच्या एका समितीमध्ये शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना संधी मिळाली आहे. विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर ते विशेष निमंत्रीत सदस्य असतील. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नेमणूक केली आहे. 

पुणे : महाविकासआघाडीच्या नवीन सरकारच्या एका समितीमध्ये शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना संधी मिळाली आहे. विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर ते विशेष निमंत्रीत सदस्य असतील. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नेमणूक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सध्याच्या विधान परिषदेत विनायक मेटे सर्वात वरिष्ठ आमदार आहेत. मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षण लढ्याच्या चळवळीतून पुढे आलेल्या विनायक मेटे यांना प्रथम युती सरकारमध्ये विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुन्हा तीन वेळा विधान परिषदेवर संधी मिळाली. मागच्या वेळी भाजपनेही त्यांना पुन्हा विधान परिषदेवर घेतले.

पाच वर्षानंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातील महिलेची करुण कहाणी

दरम्यान, त्यांना मागच्या सरकारने आंतरराष्ट्रीय शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केले होते. आता नवीन सरकारमध्येही त्यांना विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर स्थान मिळाले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समितीचे सदस्य आहेत. तर तीन विशेष निमंत्रितांत विनायक मेटे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak mete special invited member in Legislative Council