पाच वर्षांनंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातल्या महिलेची करुण कहाणी  

टीम ई-सकाळ
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळाले होते.

गोखलेनगर (पुणे) : जनवाडी-जनता वसाहत येथे अचानक लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जाळाले असून कोणतीही जिवीत हानी घडलेली नाही. मात्र, रोजंदारीवर काम करून संसार करणाऱ्या या कुटुंबावर दुसऱ्यांदा आगीचे संकट ओढावले आहे. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे अॅप डाऊनलोड करा

आगीत घरातील टिव्ही, फॅन, कपाट, मिक्सर, मोबाईल, भांडी, बिछाना, विद्यार्थ्याची शाळेची कागदपत्रे, कपडे, इतर साहित्य जाळाले. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच घराला लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळाले होते. मोठ्या कष्टानं पुन्हा संसार उभा केला. कोणाची मदत मिळाली नाही. पै अन् पै जोडून पैसा उभारला. पण, तोही आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. शुक्रवारी पुन्हा एकदा आग लागली आणि पाच वर्षांत खरेदी केलेलं साहित्य पुन्हा जळालं आणि कुटुंबापुढं पुन्हा उभं राहण्याचं आव्हान आहे. गेल्या १५ वर्षांपासून कुद्रे कुटुंब जनता वसाहत येथे पत्र्याच्या शेडमध्ये  राहतात. कष्टाने उभा केलेला संसार पुन्हा जाळाल्याने कुद्रे कुटुंब हताश झाले आहे.

आणखी वाचा - अजित पवारच आमच्याकडं आले होते; फडणवीसांचा गौप्यस्फोट

 

आम्ही बिगारी काम करून खातो. आग लागल्याचं समजताच मी घरी आले आसता. घरातील साहित्य जळाले होते, ते पाहिले आणि माझे हातपाय गळाले. कारण दोन वेळा असंच झालं.
-गंगुबाई कुद्रे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune fire at gokhale nagar woman's house for second time