Amit Shah Tadipar Remark Sparks Debate : शरद पवार यांनी राज्यात फसवणूक आणि विश्वासघाताचं राजकारण सुरू केलं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित शहा हे तडीपार झालेले पहिले गृहमंत्री आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. यावरूनच आता भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.