Vehicles Vandalized in Parbhani : परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंददरम्यान आता हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी आक्रमक जमावाने दुकानांवर दगडफेक केली आहे. तसेच जिल्हापरिषद शाळा परिससरात जाळपोळही करण्यात आली आहे. यादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच दंगलनियंत्रण पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.