Viral Audio Clip Beed: "पंकजा मुंडेंना आयुष्यात पहिल्यांदा धोका दिला," ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये राडा

Pankaja Munde: मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये यंदा अत्यंत चुरशीची निवडणुक झाली. यामध्ये पंकजा मुंडे यांचा थोडक्या मतांनी पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे जायन्ट किलर ठरले होते.
Pankaja Munde Viral Audio Clip
Pankaja Munde Viral Audio ClipEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला. यामध्ये महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. यामध्ये भाजपच्या रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भारती पवार, सुभाष भामरे आणि बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला.

या सर्वांमध्ये पंकजा मुंडे यांचा बीडमधील पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्याही केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

यानंतर आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी अनेके खळबळजनक दावे केले आहेत. याचबरोबर त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे म्हणत आहेत की, "या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्यासाठी मी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न केले आहे. यावेळी त्यांनाच मदत करणार होतो. मी आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला आहे."

दरम्यान या व्हियरल ऑडिओ क्लिपमध्ये खांडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबतही बोलत असल्याचे ऐकू येत आहे.

असे असले तरी ई-सकाळ या व्हायरल व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Pankaja Munde Viral Audio Clip
Monsoon Session 2024 : लाडकी बहीण योजना! महिन्याला मिळणार दीड हजार रुपये? मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात? काय आहेत निकष?

शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या खांडे यांचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे जालना रस्त्यावर असलेल्या कार्यालयाची पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ऑडिओ क्लिपमधील दाव्यानुसार या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांचा सहभाग असल्याचे याचे महायुतीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कोणते वळण घेतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pankaja Munde Viral Audio Clip
Mumbai Ice Cream Case: 'आईस्क्रीम'मधील बोटाचा DNA झाला मॅच; फॉर्च्यून डेअरीचा 'तो' असिस्टंट ऑपरेटर कोण?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरची जागा वगळत्या सत्ताधाऱ्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाल्याचे पाहयला मिळाले.

दरम्यान मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये यंदा अत्यंत चुरशीची निवडणुक झाली. यामध्ये पंकजा मुंडे यांचा थोडक्या मतांनी पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे जायन्ट किलर ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com