esakal | चोरी करायला गेले अन् हसं करुन आले; पाहा भन्नाट व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

Chor

चोरी करायला गेले अन् हसं करुन आले; पाहा भन्नाट व्हिडीओ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

चोरी करायला गेलेल्या चोरांचे अनेक भन्नाट किस्से आपल्या ऐकिवात आहे. एका चुकीमुळे अनेक चोर सहजरित्या पकडलेदेखील गेले आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियावर चोरांच्या टोळीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चोरी करायच्या उद्देशाने गेलेले हे चोर स्वत:चं चांगलंच हसू करुन आले आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी, अनेक लहान मोठे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असून हातावर पोट असणारे लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. याच काळात चोरांचा सुळसुळाटदेखील वाढला आहे. यामध्येच काही चोरांची टोळी लुटमारी करण्याचा हेतूने एका पेट्रोल पंपावर गेली होती. मात्र, पेट्रोल भरत असलेल्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे पुढे होणारा अनर्थ टळला आणि त्या बदल्यात ही चोरांची टोळी घटनास्थळावरुन पसारदेखील झाली.

हेही वाचा: Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही चोर एका व्हॅनमधून पेट्रोल पंपावर उतरले व समोर उभी असलेली कार चोरण्याच्या उद्देशाने पुढे सरसावले. परंतु, या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत त्यांच्यावर पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण चोरांची टोळी घाबरुन एका क्षणात घटनास्थळावरुन पसार झाली.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू अनावर झालं आहे. तर, चोरांना अद्दल घडवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कौतुकाचा वर्षावही होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ५६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज त्याला मिळाले आहेत.

loading image