Sharad Pawar : वीरेंद्र वर्मा हे शेतकऱ्यांचे खंबीर नेतृत्व

‘कर्नाल (हरियाना) लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मराठा वीरेंद्र वर्मा हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे खंबीर नेतृत्व.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

मुंबई - ‘कर्नाल (हरियाना) लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मराठा वीरेंद्र वर्मा हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे खंबीर नेतृत्व असून त्यांच्या सोबत पक्षाची सर्व ताकद त्यांच्या बरोबर राहील,’ असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कर्नाल येथील प्रचार सभेत व्यक्त केला.

‘वीरेंद्र वर्मा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा नेत्यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची गरज आहे,’ असे शरद पवार म्हणाले.

‘ही निवडणूक समाजातील शेतकरी, तरुण आणि मागास समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून सध्या देशात असलेल्या राज्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षात दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे देशात परिवर्तन करण्याची ही संधी आहे,’ असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com