शाळांमध्ये "व्हर्च्युअल क्‍लासरुम' 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 15 जानेवारी 2020

सरकारतर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केल्या. राज्यातील सर्व शाळांमध्ये "व्हर्च्युअल क्‍लासरुम' (आभासी वर्ग) उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी येथे दिले. 

मुंबई - सरकारतर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केल्या. राज्यातील सर्व शाळांमध्ये "व्हर्च्युअल क्‍लासरुम' (आभासी वर्ग) उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी येथे दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आज शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगवर भर देत असताना राज्यातील वंचित व दुर्गम शाळांसाठी आभासी वर्ग अत्यंत महत्त्वाचे ठरतील. या यंत्रणेमध्ये फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवणार नाही तर दोन्ही बाजूंनी संवाद होण्यास मदत होईल. शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सूचना 
-शिक्षकांवर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडणार नाही याची काळजी घ्यावी 
-शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमात उद्योजकांची मदत कशी घेता येईल याचे नियोजन करावे 
- स्कूल बसची सुरक्षितता शाळांनी तपासून घेणे आवश्‍यक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virtual Classroom in schools