Vishal Patil: सांगलीत रंगत वाढली, अपक्ष विशाल पाटील यांना वंचितचा 'हात'; जाहीर केला पाठिंबा

Sangali Loksabha Election: वंचितने दिलेल्या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही.
Sangali Loksabha Election|Vishal Patil
Sangali Loksabha Election|Vishal PatilEsakal

लोकसभा निवडणूक 2024 साठी सांगलीतून अपक्ष लढत असलेल्या विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

आज (मंगळवारी) वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून आणखी तीन उमेदवार जाहीर करत, सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंपा देत असल्याची माहिती दिली.

वंचितने दिलेल्या पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची ताकद नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू असलेल्या विशाल पाटील यांना गेली दोन ते तीन महिने काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र, महाविकास आघाडीत काही अनपेक्षित घडामोडी घडल्यानंतर ही जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला सुटली.

काँग्रेस पक्षाला जागावाटपात ही जागा आपल्याकडे राखता न आल्याने नाराज विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना माजी मंत्री अजित घोरपडे आणि जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच हे दोघेही विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहे.

Sangali Loksabha Election|Vishal Patil
Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने सांगलीच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

विशाल पाटील यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचे बंधू माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचितचा पाठिंबा मागितला होता. तेव्हा आंबेडकर यांनी विशाल पाटील यांचा अर्ज कायम राहिल्यास अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर पाठिंबा जाहीर करू असे म्हटले होते.

आता सांगली मतदारसंघात मतदानासाठी अवघे 8 दिवस राहिले असताना प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा जाहीर केला आहे.

Sangali Loksabha Election|Vishal Patil
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

तिरंगी लढत

सांगलीमध्ये भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे. गेली दोन टर्म खासदार असलेले संजय काका पुन्हा एकदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची मशाल हाती घेत उमेदवारी पटकावणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासमोर आपल्या पहिल्याच मोठ्या निवडवणुकीत दोन बलाढ्य उमेदवारांचे आव्हान असणार आहे.

तर, महाविकास आघाडीला काँग्रेसची जागा न सुटल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अनेक माजी मंत्री, माजी आमदारांचा पाठिंबा मिळत आहे. अशात आता वंचितच्या पाठिंब्यामुळे विशाल यांची ताकद वाढली यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com