Vishal Patil: वसंतदादांच्या नातवाचा शड्डू, मी लंगोट बांधून तयार: विशाल पाटील

Sangli Constituency: वसंतदादा पाटील यांनी शिवसेना वाढीसाठी मुंबईत मदतीची भूमिका घेतली होती, याची जाणीवदेखील विशाल पाटील यांनी यानिमित्ताने ठाकरेंना करून दिली.
Sanjay Patil and Vishal Patil
Sanjay Patil and Vishal Patilesakal

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवाने म्हणजेच विशाल पाटील यांनी आज सांगली लोकसभा मतदार संघासाठी शड्डू ठोकला. मी लंगोट बांधून तयार आहे. खासदार संजय पाटील आपली कवचकुंडले काढून मैदानात यायला तयार आहेत का, असे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार विश्‍वजीत कदम यांच्याविषयी संशय वाढवणारी वक्तव्ये केली. ती आघाडी धर्माला शोभणारी नाहीत, अशी टीका करतानाच विशाल यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे, अशी भूमिका मांडली.

आम्ही रान तापवले, त्यात चांगले पीक येणार म्हटल्यानंतर कुणालाही आपण पीक घ्यावे असे वाटू शकते. सेनेला ते वाटले यात चुकीचे नाही, मात्र त्यांनी जिल्ह्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी होती. त्यांनी सांगलीच का मागितली? त्यांनी सोलापूर, पुणे, सातारा या जागा का मागितल्या नाहीत, हा प्रश्‍न मला पडला आहे, असे स्पष्ट करतानाच सेनेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. यामागे जे घडले असेल त्याची मला माहिती मिळेल तेंव्हा मी नक्की बोलेन, असेही त्यांनी सांगितले.

Sanjay Patil and Vishal Patil
Sangli Loksabha Constituency : जयंत पाटील यांच्या मौनाचा अर्थ काय?

सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीची मंगळवारी पत्रकार परिषद होत आहे. त्यात सांगली मतदार संघाबाबत निर्णय घोषित होईल.

त्याआधी संजय राऊत यांनी तीन दिवस सांगलीत मुक्काम ठोकला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. आमदार विश्‍वजीत कदम यांच्याविषयी संशय वाढेल, अशी वक्तव्ये केली. त्याबद्दल विशाल यांनी संयत शब्दात नाराजी व्यक्त केली.

वसंतदादा पाटील यांनी शिवसेना वाढीसाठी मुंबईत मदतीची भूमिका घेतली होती, याची जाणीवदेखील त्यांनी यानिमित्ताने ठाकरेंना करून दिली.

Sanjay Patil and Vishal Patil
Lok Sabha : मतदारांच्या सुप्त संतप्त लाटेचा फटका कुणाला? वाशीम-यवतमाळ, बुलडाण्यात शिवसेना तर अमरावती, वर्ध्यात भाजपला टेन्शन!

भाजपचे उमेदवार, खासदार संजय पाटील यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना विशाल म्हणाले, ‘‘मी लंगोट बांधून तयार आहे. खासदारांनी कवचकुंडले काढून मैदानात यायची तयारी आहे का हे सांगावे. मला पळ काढू नका, असे ते आधीच म्हणायचे, कारण त्यांना भविष्यावर फार विश्‍वास आहे. त्यांना तसा साक्षात्कार झाला असेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com