सातारा, मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी, यंदा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषवणार आहे. या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘पानिपत’ सारख्या कालजयी कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे मराठी साहित्यविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.