Vishwas Patil :''इतिहासाबाबत बेजबाबदारपणे बोलू नका''; पानिपत’कार विश्वास पाटील यांनी अभिनेत्यांबरोबरच नेत्यांचेही टोचले कान!

Latest Marathi News : इतिहासाबाबत बेजबाबदारपणे बोलू नका. आधी नीट अभ्यास करा. पुरावे बघा, अशा शब्दांत ‘पानिपत’कार व ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी अभिनेत्यांबरोबरच नेत्यांचेही कान टोचले आहेत.
Vishwas Patil
Vishwas Patil esakal
Updated on

सुशांत सांगवे

Vishwas Patil Reacts to Rahul Solapurkars Comments on Shivaji Maharajs Agra Visit : छत्रपती शिवाजी महाराज हा सहज हाताळण्यासारखा विषय नाही. महापुरूषांबाबत बोलताना अभिनेते जेवढे बेजबाबदारपणे बोलत आहेत, तेवढाच बेजबाबदारपणा नेत्यांच्या वक्तव्यातूनही वारंवार दिसतो आहे. इतिहासाबाबत बेजबाबदारपणे बोलू नका. आधी नीट अभ्यास करा. पुरावे बघा, अशा शब्दांत ‘पानिपत’कार व ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी अभिनेत्यांबरोबरच नेत्यांचेही कान टोचले. ‘केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून तिचा वापर मुखातून करा’, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com