स्वच्छ सर्वेक्षणात विटा देशात प्रथम ; लोणावळा, सासवडला ही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार : Clean Survey 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Clean survey

स्वच्छ सर्वेक्षणात विटा देशात प्रथम ; लोणावळा, सासवडला ही पुरस्कार

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

विटा (सांगली) : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये विटा शहराने प्रथम क्रमांक मिळविला. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये २० नोंव्हेबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विटा पालिकेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती ब्रॅंड अॅंबेसिडर व पक्षप्रतोद माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील (Vaibhav Patil) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अॅड. पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे सातत्याने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपण विटा व परिसरात काम करतोय. या स्वच्छता अभियानात देशातील स्वच्छ शहर म्हणून दिल्ली येथे पारितोषिक मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी देशात चौथा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर आपल्या पुढे तीन नंबर आहेत. ते मागे टाकून एक नंबरला विटा शहर येईल. त्यादृष्टीने खूणगाठ बांधून गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केला. त्यास शहरातील नागरीकासह सर्व घटकांचा प्रतिसाद मिळाला. चार वर्षे एक नंबरची वाट पाहत होतो. तो नंबर मिळाला. ही गोष्ट अभिमानास्पद व भूषणावह आहे. हे श्रेय सर्वांचे आहे. माजी आमदार सदाशिवभाऊ व अशोक गायकवाड यांनी एकत्र येऊन केलेले हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

ते म्हणाले, देशातील विटा, लोणावळा व सासवड या तीन शहरांना बक्षीस मिळणार आहे. मुख्याधिकारी, पदाधिकारी, स्वच्छता कर्मचारी, शहरातील संघटना व नागरीकांसह प्रत्येकाने यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे. बक्षीस स्वीकारण्यासाठी स्वच्छता कर्मचारी असतील. त्यामुळे देशातील प्रत्येक स्वच्छता कर्मचा-यांचा बहुमान होईल. असा वेगळा प्लॅटफॉर्म आम्ही देशाला देतोय. त्यामुळे जबाबदारी सर्वांची वाढणार आहे.

विटा शहर नंबर वनला राहण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या विचाराने व माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असून भविष्यात सर्वांनी एकत्र येऊन विटा शहराचा नावलौकिक मोठा करण्यासाठी हातभार लावूया. यावेळी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, किरण तारळेकर, दहावीर शितोळे, भरत कांबळे, धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, विजय जाधव, गजानन निकम, विनोद पाटील, आनंदा सावंत, अधिकारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top