वारकरी संप्रदाय पाईक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; विठ्ठल महाराज चवरे राष्ट्रीय अध्यक्ष 

अभय जोशी 
Monday, 28 September 2020

वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विठ्ठल महाराज चवरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेची नुकतीच सर्वसाधारण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत तसेच अनेकांनी ऑनलाइन सहभागी होत सभासदांच्या एकमताने नूतन राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र व आंध्र प्रदेश, तेलंगणा प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

पंढरपूर (सोलापूर) : वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विठ्ठल महाराज चवरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेची नुकतीच सर्वसाधारण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत तसेच अनेकांनी ऑनलाइन सहभागी होत सभासदांच्या एकमताने नूतन राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र व आंध्र प्रदेश, तेलंगणा प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : विठ्ठल महाराज चवरे (राष्ट्रीय अध्यक्ष), चैतन्य महाराज देहूकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), विठ्ठल महाराज नामदास, भानुदास महाराज चातुर्मास्ये, विठ्ठल महाराज पैठणकर, रंगनाथ (स्वामी) महाराज राशीनकर (सर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष), नागेश महाराज बागडे (सचिव), भरत महाराज अलिबागकर (सहसचिव), महेशराव बाळकृष्ण भिवरे (खजिनदार), निवृत्ती महाराज नामदास (सहखजिनदार), रामकृष्ण हनुमंत महाराज वीर (प्रवक्ता). 

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : देवव्रत (राणा) महाराज वासकर, रघुनाथ महाराज कबीर, चक्रीनाथ महाराज सिद्धरस, सागर महाराज बेलापूरकर. 

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : देविदास महाराज ढवळीकर (अध्यक्ष), गणेश महाराज कराडकर (उपाध्यक्ष), श्‍याम महाराज उखळीकर (सचिव), मुरारी महाराज नामदास (खजिनदार), कृष्णा महाराज चवरे (प्रवक्ते), प्रशांत महाराज ठाकरे, भागवत महाराज जळगावकर (सदस्य). 

सोलापूर जिल्हा : विश्वनाथ महाराज राशीनकर (अध्यक्ष). पंढरपूर तालुका : सतीश महाराज पंचभाई (कंधारकर) (अध्यक्ष), माधव महाराज बडवे (उपाध्यक्ष). पंढरपूर शहर ज्ञानेश्वर महाराज तारे (अध्यक्ष), मयूर महाराज बडवे (उपाध्यक्ष), पांडुरंग महाराज देशमुख (सदस्य). 

वारकरी संप्रदाय पाईक संघ अंतर्गत विविध विभागांची घोषणा करण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे : भक्ती-शक्ती विभाग - विभागप्रमुख सौरभ काशिनाथ थिटे पाटील. पालखी सोहळा विभाग प्रमुख भागवत महाराज हंडे, गणेश महाराज कराडकर (अतिरिक्त जबाबदारी), आर्थिक स्वयंपूर्णता विभाग प्रमुख हरी महाराज लबडे. अक्षरसेवा विभाग प्रमुख चैतन्य महाराज देहूकर (अतिरिक्त जबाबदारी), रामकृष्ण महाराज ठाकूर. 

वारकरी संप्रदाय पाईक संघाने दिलेली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. श्री संत ज्ञानोबा-तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाला दिलेल्या शिकवणीनुसार संप्रदायाची सेवा अंतःकरणापासून करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करणार आहे. 
- विठ्ठल महाराज चवरे (आंबेकर-आजरेकर), नूतन राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal Maharaj Chavre elected as National President of Warkari Sampraday Paike Sangh