esakal | पक्ष बदलणाऱ्या 'या' उमेदवारांना मतदारांकडून नारळ I Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

VIDHAN-SABHA-2019

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जवळपास सर्वच आयारामांना सत्ताधारी शिवसेना-भाजपने तिकीट दिल्याने तब्बल 30 मतदारसंघांत राजकीय धुमश्‍चक्री झाली.

पक्ष बदलणाऱ्या 'या' उमेदवारांना मतदारांकडून नारळ I Election Result 2019

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या इतिहासात विरोधकांचे मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली. मात्र, यातील जवळपास पन्नास टक्‍के उमेदवारांना राज्यातील मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या जवळपास सर्वच आयारामांना सत्ताधारी शिवसेना-भाजपने तिकीट दिल्याने तब्बल 30 मतदारसंघांत राजकीय धुमश्‍चक्री झाली. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांच्या मुदतीत सर्वाधिक आमदारांनी राजीनामा देण्याचा विक्रम केला. तब्बल तीसपेक्षा जास्त जणांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला.

- जयकुमार गोरेंनी ठाेकला विजयी शड्डू I Election Result 2019

विशेष म्हणजे, विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच पक्षांतर केल्याने 'आयाराम-गयाराम' नाट्य चांगलेच गाजले होते. या वेळी 30 आयारामांना भाजप-शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले. यातील निम्मी तिकिटे तर भाजपने आयात नेत्यांना दिली.

शिवसेनेनेही विद्यमानांना डावलून जवळपास दहा आयारामांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांत कमालीची चुरस झाली असताना 30 पैकी 13 नेते पराभूत झाले. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, वैभव पिचड, मदन भोसले, भरत गावित, पांडुरंग बरोरा, रश्‍मी बागल, भाऊसाहेब कांबळे, निर्मला गावित, दिलीप माने, विलास तरे, शरद सोनावणे, आशिष देशमुख, बाळासाहेब सानप यांचा समावेश आहे. 

- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेला गृहीत धरू नका | Vidhan Sabha Result

'राष्ट्रवादी'तून आलेले भाजपचे उमेदवार आणि मतदारसंघ :-

- बबनराव पाचपुते : श्रीगोंदा (नगर) - विजयी 
- वैभव पिचड : अकोले (नगर) - पराभूत 
- राणा जगजितसिंह पाटील : तुळजापूर - विजयी 
- नमिता मुंदडा : केज (बीड) - विजयी 
- गणेश नाईक : ऐरोली - विजयी 
- राहुल नार्वेकर : कुलाबा - विजयी 

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले :- 

- जयकुमार गोरे : माण (सातारा) - विजयी 
- कालिदास कोळंबकर : वडाळा (मुंबई) - विजयी 
- राधाकृष्ण विखे पाटील : शिर्डी (नगर) - विजयी 
- नितेश राणे : कणकवली (सिंधुदुर्ग) - विजयी 
- काशिराम पावरा : शिरपूर (धुळे) - विजयी 
- गोपालदास अग्रवाल : गोंदिया - विजयी 
- हर्षवर्धन पाटील : इंदापूर (पुणे) - पराभूत 
- मदन भोसले : वाई (सातारा) - पराभूत 
- रवीशेठ पाटील : पेण (रायगड) - विजयी 
- भरत गावित : नवापूर (नंदुरबार) - पराभूत 

'राष्ट्रवादी'तून शिवसेनेत आलेले :- 

- पांडुरंग बरोरा : शहापूर (ठाणे) - पराभूत 
- भास्कर जाधव : गुहागर (रत्नागिरी) - विजयी 
- जयदत्त क्षीरसागर : बीड - विजयी 
- रश्‍मी बागल : करमाळा (सोलापूर) - पराभूत 

- राष्ट्रवादीच्या 'या' पठ्ठ्याने समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट केलंय जप्त

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले :- 

- अब्दुल सत्तार : सिल्लोड (औरंगाबाद) - विजयी 
- भाऊसाहेब कांबळे : श्रीरामपूर (नगर) - पराभूत 
- निर्मला गावित : इगतपुरी (नाशिक) - पराभूत 
- दिलीप माने : सोलापूर मध्य - पराभूत 
- विलास तरे : बोईसर (पालघर) - पराभूत 
- शरद सोनावणे : मनसेतून शिवसेनेत-जुन्नर (पुणे) - पराभूत 

भाजपमधून आघाडीत गेलेले :-

- आशिष देशमुख : भाजप ते काँग्रेस-नागपूर नैर्ऋत्य - पराभूत 
- उदेसिंह पाडवी : भाजप ते काँग्रेस-शहादा (नंदुरबार) - विजयी 
- बाळासाहेब सानप : भाजप ते राष्ट्रवादी काँग्रेस-नाशिक पूर्व - पराभूत  

काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस :-

- भारत भालके : पंढरपूर (सोलापूर) - विजयी