

Maharashtra Municipal Elections Witness Clashes and Allegations
Esakal
राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आज मतदान सुरू आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान होणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. अंबरनामथ्ये २०८ बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदे गटावर केलाय. तर कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारात बाचाबाची झाली. याशिवाय नांदेडमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.