

Solapur ZP
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ गट व ११ पंचायत समित्यांचे १३६ गण आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील उमेदवारासाठी एका उमेदवारास दोन मते द्यावी लागणार आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गट व गणाअंतर्गत २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी असलेल्या एकूण मतदारांमध्ये ३८ हजार ९०९ मतदार दुबार आहेत. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सर्व दुबार मतदारांपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोचू शकली नाही. अनेक मतदारांची नावे नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आहेत.
नगरपालिका व महापालिकांसाठी मतदान करुन काहीजण आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी देखील मतदान करतील, अशी स्थिती आहे. आता महापालिकेसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तत्पूर्वी, दुबार मतदार नेमके कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान करणार हे हमीपत्र घेणे शक्य नाही. कारण, गुरुवारी महापालिकेसाठी मतदान झाल्यावर जिल्हा परिषदेचीच निवडणूक बाकी असणार आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्रे अन् मतदार
तालुका मतदान केंद्रे एकूण मतदार
करमाळा २४४ २,०८,०२३
माढा २६९ २,५८,७१४
बार्शी २५६ २,१४,७५४
उ.सोलापूर ९७ ८८,९९२
मोहोळ २२० १,९८,३३८
पंढरपूर ३०९ २,८५,८२६
माळशिरस ३६३ ३,१८,२८१
सांगोला २७४ २,६२,३६७
मंगळवेढा १८९ १,६९,५३६
द.सोलापूर २४७ २,२३,३६७
अक्कलकोट २९० २,३१,०२९
एकूण २७५८ २४,५९,२२७
१३७९ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार ७५८ मतदान केंद्रे आहेत. त्यातील ५० टक्के म्हणजेच एक हजार ३७९ केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे. त्याठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसून या मतदान केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे. निवडणुकीसाठी साडेसात हजार बॅलेट युनिट, ३३६६ कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.