Wadala Road Woman death Case
esakal
वडाळा रोड येथील कादरी एम्पायर इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १६) दुपारी घडली. बुशरा अंजुम शेख (वय ३३) असे मृत तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.