मॉन्सूनसाठी आणखी पाच दिवस प्रतीक्षा

monsoon
monsoon
Updated on

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे (मॉन्सून) पडणाऱ्या पावसाचा यंदाही शहरातील मुहूर्त चुकला आहे. जूनची 13 तारीख ओलांडली, तरीही मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झाला नाही. तळकोकणात मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात येण्यासाठी त्यानंतर आणखी दोन ते तीन दिवस लागतील. त्यामुळे 18 जूनच्या दरम्यान तो पुण्यात दाखल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

आतापर्यंत पुण्यात मॉन्सून सर्वांत लवकर म्हणजे 29 मे 1962 ला दाखल झाला होता. मात्र, गेल्या अठरा वर्षांमध्ये मॉन्सून फक्त एकदाच मेमध्ये पुण्यात बरसला आहे. शहरात 31 मे 2006 रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे त्या वर्षी जूनमध्ये 306.4 मिलिमीटर पाऊस पडला. सर्वांत उशिरा म्हणजे 28 जून 1974 ला मॉन्सून शहरात पोचला होता. तर, गेल्या अठरा वर्षांमध्ये सर्वांत उशिरा 21 जून 2009 मध्ये शहरात दाखल झाला होता. त्या वर्षी जूनमध्ये 229 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

मॉन्सून पुण्यात दाखल...............जूनमध्ये नोंदलेला पाऊस 
गेल्या 19 वर्षांच्या तारखा.......... (आकडे मिलिमीटरमध्ये)
 
6 जून 2000 ........................... 240.6 
9 जून 2001 ........................... 160 
11 जून 2002 ........................... 293.5 
16 जून 2003 ........................... 308.6 
10 जून 2004 ........................... 316.2 
19 जून 2005 ........................... 547.8 
31 मे 2006 ........................... 306.4 
18 जून 2007 ........................... 492.1 
7 जून 2008 ........................... 325.6 
21 जून 2009 ........................... 229 
11 जून 2010 ........................... 590.7 
4 जून 2011 ........................... 510.6 
17 जून 2012 ...........................68.8 
8 जून 2013 ........................... 505.6 
17 जून 2014 ........................... 29 
12 जून 2015 ........................... 412.4 
20 जून 2016 ........................... 75.2 
12 जून 2017 ........................... 177.3 
9 जून 2018 ............................. 285.2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com