

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या अन् खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचं आता पुणे कनेक्शन समोर आलं आहे. कारण, याच वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींची संपत्ती आहे. यातील काही संपत्ती खरेदी करण्यात पुण्याच्या भाजप नेत्यानं मदत केल्याचा सीआयडीला संशय आहे. हा भाजप नेता कोण आणि पुणे कनेक्शन काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.