
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला आहे. त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोर्चे काढून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे स्नेही वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे .
याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला अटक झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड दहशत, गुंडगिरीच्या जिवावर एवढा मोठा झाला की, त्याच्यापुढे मुंडेही खुजे वाटू लागले. बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा, जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत या वाल्मीकची मजल गेली. दहशतीच्या जोरावर त्याने आपले साम्राज्य ऊभे केले