
पिझ्झाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण आता या पिझ्झामुळे पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिझ्झा खाण्याच्या इच्छेमुळे, वसतिगृहात पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर हाकलून लावण्यात आले. पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात ही घटना घडली.