‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के

प्रभाकर कोळसे
Friday, 1 January 2021

वर्धा जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १,५१२ शाळांपैकी १,०७४ शाळांनी (७१.०३) नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १,७६७ पैकी १,६११ शाळांची नोंदणी केली आहे.

नंदोरी (जि. वर्धा) : फिट इंडिया मोहिमेअंतर्गत यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची ऑनलाइन नोंदणी २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती. यात वर्धा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ७१.०३ शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्हा सर्वात शेवटी आहे.

मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरांवर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे भरण्यात यावी यासाठी ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर २७ डिसेंबरपर्यंत करावयाची होती.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

वर्धा जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील १,५१२ शाळांपैकी १,०७४ शाळांनी (७१.०३) नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १,७६७ पैकी १,६११ शाळांची नोंदणी केली आहे. (९१.१७ टक्‍के) राज्यात फिट इंडिया मोहिमेअंतर्गत १,०९,९०८ शाळांपैकी ५०,८३८ (४६.२५ टक्‍के) शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. 

राज्यातील पहिले पाच जिल्हे

जिल्हा एकूण शाळा नोंदणी झालेल्या शाळा टक्‍केवारी
मुंबई १७६७ १६११ ९१.१७
वर्धा १५१२ १०७४ ७१.०३ 
अकोला १८६४. १३४३ ६६.३८ 
सिंधुदुर्ग १७३७ ११४५ ६५.९२ 
यवतमाळ ३३४७ २१०० ६२.७४

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wardha district in Fit India is second in the state