पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

Maharashtra Rain : विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंगणघाट वर्ध्याची पूर (Wardha Flood) परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पाहणीदरम्यान, फडणवीसांनी शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसानं दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलंच झोडपलं होतं. मात्र, सोमवार आणि मंगळवार सकाळपासून पुन्हा थोड्या-थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेनं नियोजन केलं नसल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Devendra Fadnavis
कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा..; भाजपच्या खासदाराला धमकीचं पत्र

फडणवीस पुढं म्हणाले, पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुय. सध्या मोठ्या प्रमाणात वर्ध्याला पुराचा फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं त्यांनी आश्वासन दिलंय. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय. रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळं अनेक गावांना पुरानं वेढलं आहे. देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक इथं सुद्धा पुराच्या पाण्यानं शिरकाव केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जातं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com