हा काय प्रकार! शिक्षक कमी असल्याने सफाई कामगारावर शिकवण्याची जबाबदारी; आदेशच काढला
Shocking Revelations from Pulgaon: पुलगावमधील राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत जवळपास 60 विद्यार्थी आहेत, पण तिथे फक्त एकच शिक्षक आहे. यामुळे दुसऱ्या शाळेतून एका शिक्षकाला इथे पाठवण्यात आले आहे.
Wardha Latest News: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगर परिषदेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत शिक्षक कमी असल्याने, चक्क एका सफाई कामगारालाच विद्यार्थ्यांना शिकवण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. असा आदेशच नगर पालिकेने काढलेला आहे.