esakal | Wari 2019 : रणरागिनी मातेचा निर्भीडपणा
sakal

बोलून बातमी शोधा

Rani-jadhav

मुलांचा सांभाळ करताना शहरी भागात बऱ्याच गोष्टीचा ऊहापोह होतो. मात्र म्हाळूंगच्या रणरागिनी मातेने तीन्ही मुलींसह मुलास स्वतःच्या पायावर उभ राहयला शिकवले. मुलींना विशेष कणखर केले. तेही पतीचे निधन झाल्यानंतर. पतीचे निधानास किमान पंधला वर्षे झाल्याचे त्यांनी सांगतिले. त्यावेळी मुल लहान होती. पदरात तीन मुलीही होता. मात्र ही माता डगमगली नाही. तीने खंबीरपणे अनेक संकटांचा सामना केला. मुलीं बाबत समाजाची मानसिकता कशी आहे, याची जाणीव असल्याने मुलींवर संस्कार ठेवून बंधने झुगारून या मातेने वेगळाच आदर्श निर्माण केल्याची जाणीव होवून गेली.

Wari 2019 : रणरागिनी मातेचा निर्भीडपणा

sakal_logo
By
सचिन शिंदे

कोणीही साथ दिली नाही, तरी निसर्ग साथ देतो. त्यालाच लोक देवाची साथ म्हणतात. संत तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील म्हाळूंग गाव येते. त्या गावात अशीच एक रणरागिनी माता भेटली. पालखी सोहळा पुढ सरकत होता. चहा घ्यायचा म्हणून म्हाळूंग येथील एका टपरी वजा हाॅटेल असलेल्या हाॅटेल पृथ्वीराजमध्ये थांबलो. त्या हाॅटेलमध्ये एक मावशी होती.

चहा करतानाच सहज बोलणे झाले. त्यावेळी त्या मावशीची मुलांना शिकवण्याची जिद्द, चिकाटी जाणवून गेली. सहज चौकशी केल्यावर मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांना कणखर बनवून समाजात ताट मानेन चालता यावे म्हणून घेतलेल कष्ट त्यांनी सांगितले. त्यावेळी थक्क व्हायला झाल.

मुलांचा सांभाळ करताना शहरी भागात बऱ्याच गोष्टीचा ऊहापोह होतो. मात्र म्हाळूंगच्या रणरागिनी मातेने तीन्ही मुलींसह मुलास स्वतःच्या पायावर उभ राहयला शिकवले. मुलींना विशेष कणखर केले. तेही पतीचे निधन झाल्यानंतर. पतीचे निधानास किमान पंधला वर्षे झाल्याचे त्यांनी सांगतिले. त्यावेळी मुल लहान होती. पदरात तीन मुलीही होता. मात्र ही माता डगमगली नाही. तीने खंबीरपणे अनेक संकटांचा सामना केला. मुलीं बाबत समाजाची मानसिकता कशी आहे, याची जाणीव असल्याने मुलींवर संस्कार ठेवून बंधने झुगारून या मातेने वेगळाच आदर्श निर्माण केल्याची जाणीव होवून गेली. एक मुलगी पोलिसात भरती झालीय. दुसरी मुलगी फौजदारकीची परिक्षा देतेय, लहान मुलगीने ब्युटीशीयनचा कोर्स पूर्ण केला आहे. तर मुलगा पुण्यात सिंहगड इन्सिट्युटमध्ये बीबीएचा कोर्स पूर्ण करतोय.

मुलांच्या शिक्षणाला कितीही खर्च येवू देत मी करायला तयार आहे, असे सांगताना मुलांना सरकारी आॅफीसर बनविण्याची त्या रणरागिनी मातेचा प्रचंड आत्मविश्वास दिसला. मुलींनी मोबाईल दिला नाही, मात्र वागण्याची मोकळीक त्यांनी दिली आहे. मैत्रीणीप्रमाणे गप्पा मारून मोकळे वागणेही त्यांनी शिकवले. आई कष्ट करतेय म्हणूव मुलही शिकताहेत. मोठी मुलगी रत्नागीरी येथे पोलिस खात्यात भरती झाली आहे. तर दुसरी फौजदारकीची परिक्षा देते आहे. अगदी साधी राहणी. छप्पर वजा खोपटात चहाची टपरी.

त्या टपरीत काही लोक नाश्ता करत होती. तर एक मुलगी येणाऱ्या वारकऱ्यांना चहा देत होती. त्या गर्दीतही त्यांच्यातील समन्वय चांगला दिसला. सुमारे पंधरा वर्षापूर्वी राणी जाधव यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी चारही मुल अगदी लहान होती. त्यांना काही कळायच्या आतच त्यांच्या डोक्यावरील वडीलांच छत हरपल होतं. काय करायचे, मुल कशी वाढवायची असा यक्ष प्रश्न राणी जाधव यांच्या पुढ होता. पतीची चहा, नाश्त्याची टपरी चालू करण्याच निर्णय घेतला. समाजातून नेहमी प्रमाणे दोन तीन प्रवाह सुरू झाले. मात्र त्या प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी प्रवास केला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामुळे बराच हातभार लागल्याचे त्या मान्य करतात. सोलापूर जिल्ह्यात म्हाळंग गाव येते. गावातील वस्ती विखुरलेली. मुळ गाव बाजूला तर दोन वस्त्या विखुरलेल्या.

अख्ख गाव दुष्काळाशी सामना करतय. घराटी टॅकर शिवाय पाणी येत नाही. भाटघर धरणाचा कालवा गावातून गेला आहे. मात्र सहा महिने त्या कालव्याला पाणी आलेले नाही. पालखी सोहळ्याला हमखास पाणी येत. मात्र यंदा सोहळा आला तरी कालव्याला पाणी आल नव्हते. इतक्या दाहक दुष्काळी स्थिती असलेल्या म्हाळूंगात राणी जाधव यांना कष्टाने त्यांचा संसार फुलवला आहे. कितीही कष्ट पडोत, मुलांना शिकवायचे ध्येय त्यांनी ठेवले आहेॊ त्याला मुलही चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याची परिणीती त्यांच्या शिक्षणात सध्या दिसते आहे. दुसरी मुलगी फौजदारकीची परिक्षा देतेय. तीच्या तयारीला लागणारा खर्चही त्या करत आहेत. मुलगा पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकतोय त्यालाही काही त्या कनी पडू देत नाहीच.

राणी जाधव यांनी घेतलेले कष्ट व त्यातून फुललेला संसार परिसरात कौतुकाचा विषय आहे. मुलांवर शिक्षण लादण्या एवजी त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी सपोर्ट करणारी माता, असाही त्यांचा उल्लेख होवू शकतो. पालखी  सोहळा तिथून जातो. आजही तो निघाला होता. त्यावेळी एका दिंडीत वारकरी एका सुरात 
लेकुराचे हीत
वाहे माऊलीचे चित्त
एेसी कळवळ्याची जाती
करी लाभावीन प्रिती.....
हा  संत तुकाराम महाराज यांचा अभंग म्हणत गेली. तो अभंग व म्हाळूगातील रणरागिणी मातेची वाटचाल एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटल्या.

loading image