Shamsundar Maharaj on Urban Naxal : पंढरपूरची संतपरंपरा आणि वारीची शुद्ध आध्यात्मिकता यांवर शंका घेणाऱ्या वक्तव्यांमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी वारीमध्ये 'अर्बन नक्षल' अर्थात शहरी नक्षलवादी विचारांचा प्रचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर, महाराष्ट्रातील पुरोगामी वर्तुळ आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.