Sex Tantra Camp: विकृत संस्कृतीची निर्मिती होऊ देणार नाही; सेक्स तंत्र शिबीराला हिंदू महासभेचा विरोध

पुणे शहरात नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Warning to Anand Dave President of Hindu Mahasabha Sex Tantra Camp Arranged In Pune
Warning to Anand Dave President of Hindu Mahasabha Sex Tantra Camp Arranged In Pune esakal

पुणे शहरात नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकींग करण्यात येत आहे. दरम्यान, सेक्स तंत्र जाहिरातीला हिंदू महासभेने विरोध करत पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटलं आहे.(Warning to Anand Dave President of Hindu Mahasabha Sex Tantra Camp Arranged In Pune )

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सेक्स तंत्र जाहिरातीला विरोध दर्शवत विकृत संस्कृतीची निर्मिती होऊ देणार नाही. हा गलिच्छ विकृत व्यवसाय आहे. हिंदू महासभा पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Warning to Anand Dave President of Hindu Mahasabha Sex Tantra Camp Arranged In Pune
धक्कादायक ! नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यात लैंगिक प्रशिक्षण देण्याचा प्रकार उघड

नवरात्री स्पेशल असं नाव या विकृत प्रकरणाला दिल गेल आहे हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही. ना आयोजकांचा पत्ता ना नावे ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती. यावरूनच हे सर्व फसव, घाणेरडे आणि एका नवीन विकृत संस्कृती ला जन्म देणारे ठरणार आहे आणि हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. अशा शब्दात हिंदू महासभेने सेक्स तंत्र जाहिरातीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

तसेच, आज 11.30 वाजता पोलिस आयुक्ताला यासंदर्भात निवदेन देणार असल्याचे सांगत या विकृतीला रोखण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते आम्ही करू असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

लैंगिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात जाहिरात आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या लैंगिक शिबिराचे आयोजन १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. यात तरुण आणि तरुणी सहभाग घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये फी आकारली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com