धक्कादायक ! नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यात लैंगिक प्रशिक्षण देण्याचा प्रकार उघड

Partner
Partner
Updated on

पुणे - पुणे शहरात नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकींग करण्यात येत आहे.

Partner
मोदींवर पूर्ण विश्वास, ६ महिन्यात राज्यात उद्योग येतील; सत्तार यांचा छातीठोक दावा

लैंगिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात जाहिरात आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या लैंगिक शिबिराचे आयोजन १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. यात तरुण आणि तरुणी सहभाग घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये फी आकारली जाणार आहे. या बाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, लैंगिक प्रशिक्षणाच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट आहे. यासंदर्भात ऑनलाईन जाहिरात कऱण्यात आली आहे. यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचा नवरात्रीशी काहीही संबंध नसल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं.

Partner
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा म्हणजे केवळ मनोरंजन; नारायण राणेंचा हल्लाबोल

सेक्स रॅकेट चालण्यासाठी ही नवीन युक्ती शोधून काढली आहे. मात्र अशा प्रकारचं शिबीर आम्ही पुण्यात होऊ देणार नाही. जर लैंगिक शिक्षणाचे धडे द्यायचे असेल तर त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर असतात. शिवाय त्यावर वयाची अट टाकण्यात आली नसल्याचंही रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis
Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days
Exemplary Patriotism: 84-Year-Old Retired Teacher Donates ₹1 Crore for Soldiers' Welfare
High-Octane Chase: Narayangaon and Shirur Police Deploy Heavy Force After Highway Shootout
Marathi News Esakal
www.esakal.com