खुशखबर! आता रेल्वेत या नविन सुविधा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

रेल्वे प्रवाश्यांसाठी 2022 पासून प्रवास करणे आणखी आरामदायक आणि मनोरंजनात्मक असणार आहे. कारण आता रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी कोणत्याही अडथळ्याविना चित्रपट आणि व्हिडीओ पाहू शकणार आहेत.

दिल्ली : रेल्वे प्रवाश्यांसाठी 2022 पासून प्रवास करणे आणखी आरामदायक आणि मनोरंजनात्मक असणार आहे. कारण आता रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी कोणत्याही अडथळ्याविना चित्रपट आणि व्हिडीओ पाहू शकणार आहेत.

मंगळवारी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सरकारी दूरसंचार कंपनीने रेल्वे आणि स्थानकांवरील मागणीनुसार (सीओडी) सामग्री पुरवण्यासाठी झी एंटरटेनमेंटच्या साहाय्यक मेसर्स मार्गो नेटवर्कची डिजिटल एंटरटेनमेंट सव्हीस प्रोव्हायडर (डीईएसपी) म्हणून निवड केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढील दोन वर्षात सुरु हेणार सेवा-रेलटेलने म्हटले आहे की, पुढील दोन वर्षांमध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व प्रिमियम/ एक्सप्रेस/ मेल यांच्यासह उपनगरातील रेल्वे गाड्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होईल. यामध्ये चित्रपट, शो, शैक्षणिक कार्यक्रम अशा अनेक गोष्टी शुल्क आणि निशुल्क अशा दोन्हीही प्रणालीत उपलब्ध  असतील. दोन्हीही प्रणाली दहा वर्षांसाठी असतील. ज्यामध्ये अंमलबजावणी पहिले दोन वर्ष देखील सामील आहेत. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

यात्रेकरूंना मिळणार या सुविधा- सीओडी इ-काॅमर्स किंवा एम-काॅमर्स आणि ट्रव्हल बुकींग (बस, काॅब, ट्रेन) इत्यादी सुविधा देखील देईल आणि त्याबरोबरच डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रातील अन्य नाविन्यपुर्ण उपायही यासाठी वापरले जातील. यामुळे प्रवासात मोबाईल नेटवर्क नसले तरी प्रवासी चांगल्या मनोरंजनाचा लाभ घेऊ शकणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watch movies shows on trains indian railways to offer this new facility