

तात्या लांडगे
सोलापूर : उजनी धरणात सध्या ८४ टीएमसी पाणीसाठा असून, त्यात २० टीएमसी उपयुक्त साठा आहे. सध्या शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. एप्रिलअखेर भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे १० ते १५ मे दरम्यान धरण उणे पातळीत जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उन्हाच्या तडाख्याने शेतीपिके माना टाकू लागली होती. या पार्श्वभूमीवर शेतीसाठी सध्या सलग दोन उन्हाळी आवर्तने सोडण्यात आली. सध्या दोन्ही कालव्यातून आणि बोगदा व सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून पाणी सुरू आहे. त्यासाठी दररोज अर्धा टीएमसी धरणातील पाणी कमी होत आहे.
जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर जमिनीला उजनीचे पाणी थेट पोचते. शेतीचे पाणी साधारणत: ३० मेपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे एप्रिलअखेर भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून, त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर यंदाही मे महिन्यात पण गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० दिवस उशिरा धरण उणे पातळीत जाणार आहे.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
८३.५४ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
१९.६७ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
३७.६२ टक्के
धरणातून सोडलेले पाणी
३९९० क्युसेक
उणे ८० टक्क्यांपर्यंत महापालिकेला करावे लागणार नाही दुबार पंपिंग
सोलापूर ते उजनी (११० किलोमीटर) १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यातून सध्या शहरासाठी पाणी उपसा होतो. जुन्याही पाइपलाइनमधून पाणी उपसा सुरू आहे. धरण उणे ३२ टक्के झाल्यावर जुनी पाइपलाइन बंद पडते; पण समांतर जलवाहिनीचा उपसा धरण उणे ८० टक्के होईपर्यंत सुरूच राहणार आहे. धरण उणे ३२ टक्के झाल्यावर जुनी पाइपलाइन बंद ठेवून समांतर जलवाहिनीतूनच पाणी उपसा होईल, जेणेकरून दुबार पंपिंगवरील लाखोंचा खर्च होणार नाही, असे नियोजन असल्याचे महापालिकेचे सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. नदीतून पाणी सोडल्यावर औज बंधारा भरेल, त्यातूनही पाणी उपसा होईल, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.